Visavaचा उपयोग कसा करावा
7 Things to do after you download the Visava Document

Visava हे एक डिजिटल टूल आहे जे यूजर्सना त्यांचे घर स्क्रॅचपासून डिझाइन करण्यास मदत करते. हे यूजरला प्रश्नांच्या एक मालिकेद्वारे घर वैयक्तिकृत करण्यास अनुमती देते जे बदल्यात प्रत्येक वेळी एक अद्वितीय डिझाइनचे समाधान देते. त्याचे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित इंजिन प्रत्येक उत्तराची अंमलबजावणी करण्यास शिकते आणि ते तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व डॉक्युमेंटसह वैयक्तिक डिझाइन तयार करते. तंत्रज्ञानाच्या मागे वास्तविक आर्किटेक्टचे सर्व कौशल्य आहे आणि क्षेत्राचे विस्तृत बारकावे 5 प्रश्नांमध्ये कव्हर करून तुमचे योग्य दिशेने मार्गदर्शन करते.

एकदा का तुम्ही Visavaच्या वेबसाइट किंवा अॅप वर पोचल्यानंतर, या तंत्रज्ञानाची झलक पाहण्यासाठी साइन अप करणे सोपे होईल आणि मुख्य म्हणजे ते विनामूल्य आहे. तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी सोबत तुमचे नाव टाका आणि बघा! तुम्ही आता Visavaच्या डिजिटल क्षेत्रात आहात आणि तुमच्या स्वप्नातील घराचे डिझाइनिंग लगेचच सुरू करू शकता. पुढील पाच टप्पे तुमच्या नवीन घरासाठी ब्लूप्रिंट्स मिळवण्यासाठीचे आहेत.

टप्पा 1: साइटची निवड: जर तुम्ही आधीच साइटवर असाल तर, एकतर तुमचा परिसर शोधून किंवा थेट तुमच्या वर्तमान स्थानाचा उपयोग करून तुमच्या साइटचे स्थान पटकन निवडा. पुढील निवडा.

टप्पा 2: बांधकामाचे क्षेत्र: तुम्हाला येथे फक्त तुमच्या घराची लांबी आणि रुंदी माहित असणे आवश्यक आहे. हे युनिट एकतर फूट किंवा मीटरमध्ये प्रविष्ट केले जाऊ शकते, ज्यात किमान 6फूट/1.8मी आणि जास्तीत जास्त 50फूट/15.2मी असू शकते. पुढील निवडा.

टप्पा 3: मुख्य दरवाजाचे स्थान: आता तुम्हाला तुमच्या घराची दिशा माहीत असल्याने मुख्य दरवाजा कुठे लावायचा हे तुम्ही ठरवू शकता. पुढील निवडा.

टप्पा 4: तुमची प्राधान्ये प्रविष्ट करा: तुम्हाला आता घरात किती बेडरूम आणि मजले असायला हवेत ते निवडायचे आहे. या प्राधान्यासाठी इष्टतम संभाव्य पर्याय तुम्ही आधीच्या टप्प्यांमध्ये प्रदान केलेल्या डेटाद्वारे निर्धारित केले जातात, असे काही जे Visavaच्या तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. जरी आम्ही आमच्या यूजर्सना अधिक स्वच्छ राहणीमान वातावरणासाठी आतमध्ये बाथरूम असावे यासाठी प्रोत्साहित करीत असलो तरी तुमच्या घरामध्ये बाथरूम असावे की नाही हे देखील तूम्ही निवडू शकता. पुढील निवडा.

टप्पा 5: बजेट: तुमच्या घराची डिझाइन पूर्ण करण्यासाठी तुमचे बजेट ही शेवटची गोष्ट आहे जी तुम्हाला ठरवायची आहे. कमीत कमी रु.50,000 पासून सुरू होणाऱ्या किमान बजेट बरोबर, व्यावहारिकदृष्ट्या देऊ शकेल तितक्या आर्थिक स्वातंत्र्यासह Visavaला त्याच्या सर्व यूजर्सना एक अद्वितीय डिझाइन प्रदान करण्याची आशा आहे. पुढील निवडा.

तुम्हाला आता डिझाइनवर आपोआप नेले जाईल, जिथे Visavaचे शक्तिशाली इंजिन तुम्हाला तुमच्या भावी घराची पहिली झलक दाखवण्यासाठी झटपट एक 3D मॉडेल तयार करेल. तुम्ही झूम इन आणि झूम आउट करू शकता आणि मॉडेलला अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी फिरवू शकता. हे मॉडेल, नमुना डॉक्युमेंटसह, तुमच्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. जर डिझाईन तुमच्या अपेक्षेनुसार असेल, तर थोड्या शुल्कात तुम्ही डिझाइनची सर्व रेखाचित्रे, घर बांधण्यासाठी लागणाऱ्या मटेरियलचे प्रमाण आणि प्रत्येक मटेरियलचा तपशीलवार खर्च मिळवू शकता. तुम्हाला दिलेल्या तपशिलांमध्ये काही बदल करायचे असल्यास, तुम्ही तुमचे घर ‘संपादित’ करणे निवडू शकता. जोपर्यंत डिझाइन तुम्हाला हवी तशी होत नाही तोपर्यंत तुम्ही ही संपादने चालू ठेऊ शकता.

प्रत्येक टप्पा कामासाठी समर्पित असलेल्या आर्किटेक्ट्स आणि संशोधकांच्या समूहाद्वारे निर्धारित केली जाते हे जाणून यूजरला मानसिक शांती मिळू शकते. प्रत्येक टप्पा घराच्या डिझाइनवर त्याच्या अनोख्या पद्धतीने परिणाम करतो आणि हे परस्परावलंबी घटक एकत्रितपणे वेब तयार करतात जे तुमची आवड सर्वात जास्त आकर्षित करतात.

तुमच्या घराचा भूगोल आणि संदर्भ हे सर्वोत्कृष्ट आणि किफायतशीर बांधकाम मटेरियल आणि कार्यपद्धती, भिंती आणि प्रवेशद्वारांची दिशा तसेच निवासस्थानाचे एकूण माप आणि आकार निश्चित करण्यासाठी मूलभूत आहेत. एक महत्त्वाकांक्षी घरमालक या नात्याने, तुम्ही आधीच एकूण खर्च कमी करण्यास सुरुवात करता.

तुमच्या साइटच्या आजूबाजूच्या संदर्भावर आधारित, तुम्ही आता तुमच्या घराचा आकार आणि दिशा ठरवण्यास मोकळे आहात. एक्सेस मार्गाची स्थिती, शेजारची घरे किंवा इतर कोणतेही बांधकाम किंवा स्थानिक मार्ग देखील तुमच्या साइटसाठी विशिष्ट आहेत. हे मुख्य दरवाजाच्या प्लेसमेंटवर देखील परिणाम करते, जो या प्रक्रियेचा पुढील टप्पा आहे. आकार एकतर फूट किंवा मीटर म्हणून भरला जाऊ शकतो, जे वापरकर्ता म्हणून तुम्हाला अधिक सोयीस्कर असेल.

मुख्य दरवाजाची दिशा पुन्हा साइटच्या सभोवतालच्या परिस्थितीवर आणि आपण कोणत्या दिशेपासून आपल्या घरात प्रवेश करू इच्छिता त्यावर अवलंबून असते. तुम्ही हा निर्णय वास्तुशास्त्र, फेंगशुई किंवा तुम्हाला योग्य वाटत असेल अशा कोणत्याही तर्काच्या आधारे घेण्याची देखील निवड करू शकता. तुमची कारणे काहीही असली तरी, निवड सोपी आहे आणि ड्रॉप-डाउन सूची तुम्हाला निवडण्यासाठी चार मुख्य दिशा देते.

बांधकामाचे क्षेत्रफळ आणि घराच्याच आकारावर आधारित, कोणत्याही प्रकारे पैसे किंवा संसाधने वाया न घालवता, डिझाइनसाठी ठराविक खोल्या आणि मजले प्रदान केले जाऊ शकतात. Visavaचे AI तंत्रज्ञान याची खात्री करूम घेईल की डिझाइन एखाद्या आर्किटेक्टप्रमाणे तुमच्या गरजा उत्तम प्रकारे सामावून घेते आहे की नाही. फ्लोर प्लान्स अशा तऱ्हेने आपोआप तयार केले जातात ज्यामुळे ते चांगल्या नियोजनाच्या किमान अटींची पूर्तता केली जात आहे की नाही याची खात्री करतात. अन्यथा डिझाइन प्रमाणेच अमूर्त अशा गोष्टीसह तंत्रज्ञान एकत्रित करताना त्याच्या टीमने केलेल्या प्रचंड अभ्यास आणि संशोधनामुळे हे शक्य झाले आहे. केवळ सॉफ्टवेअर असण्यापासून ते वास्तववादी टूल होण्यापर्यंत हेच Visavaला आणखी एक पाऊल वर नेऊन ठेवते. एकदा तुम्ही हे आकडे ठरवले की, कॉरिडॉर, पायऱ्या आणि जागा बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या स्ट्रक्चरल सिस्टमसह आतील जागेचे नियोजन आपोआप तयार होते.

बाथरूम आवश्यक आहे की नाही हा प्रश्न काहींना गोंधळात टाकू शकतो, परंतु भारताच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात ही एक सामान्य गोष्ट आहे. घरात एक बाथरूम असल्‍याने त्यांना धक्काच बसेल. घरातील बाथरूम अशुद्ध असतात आणि घर अशुद्ध बनवतात अशा जुन्या धारणेामुळे हे घडत आहे. जरी Visava प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या विश्वासाची पर्वा न करता सुलभ असण्याची आशा करीत असला तरी, आम्ही आमच्या यूजरना घरामध्ये बाथरूम असण्याची निवड करण्यासाठी प्रोत्साहित करतो. विशेषत: घरातील महिलांसाठी अधिक स्वच्छ राहणीमान वातावरण बनवण्यात हे खूप मदत करेल. 

बजेट म्हणजे घर बांधण्यासाठी तुमच्याकडे असलेला एकूण उपलब्ध निधी. Visava हे एक असे टूल आहे ज्याचा उद्देश भारतातील जनतेला त्यांचे घर बांधण्याची प्रक्रिया त्यांच्या हातात घेण्यास सक्षम बनवणे आहे. आम्हांला अनेक इच्छुक घरमालकांच्या अर्थसंकल्पीय मर्यादांची जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही याची खात्री करू इच्छितो की जास्त निधीची कमतरता हे कोणीतरी असे करण्यापासून वंचित राहण्याचे कारण नाही.

Visavaने आमचे टूल विनामूल्य वापरून पाहण्याचा पर्याय जाणीवपूर्वक ठेवला आहे. MCQ सारख्या एखाद्या डिझाइनला शॉर्टलिस्ट करण्यासाठी पूर्व-निर्धारित योजनांच्या कॅटलॉगचा हे वापर करत नाही. प्रत्येक इनपुट मध्ये त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म समाविष्ट असलेल्या तर्कशास्त्राची एक श्रृंखला समाविष्ट असते. विस्तृत संशोधन, अभ्यास आणि डिझाइन विकासावर आधारित हे इनपुट एका जटिल वेबमध्ये एकाच वेळी परस्पर आणि आंतर-आवलंबी असतात. घर बांधताना काय काय लागते याबद्दल कोणतीही पूर्व माहिती नसलेल्या व्यक्तीसाठी, प्रक्रिया कोठून सुरू करावी हे शोधणे कठीण होऊ शकते. हे बजेट असावे की बांधकामाचे क्षेत्र? एकमजली घराच्या समान बजेटमध्ये दुमजली घर बांधणे शक्य आहे का?

युजर्सना हे आउटपुट अमर्यादपणे संपादित करण्याची परवानगी देऊन, ते त्यांना सक्षम बनवण्याचा आणि निर्णयांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते. लेगो सेटप्रमाणे घरे पुन्हा पुन्हा बांधता येत नाहीत. तरीही, चुका नेहमीच घडतात, विशेषत: जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा काहीतरी करते. घेतलेला प्रत्येक निर्णय परिणाम, अस्पष्ट निर्णय आणि वाढणाऱ्या तणावावर जोर देतो. Visava हा भार घरमालकाच्या खांद्यावरून उचलू इच्छितो आणि त्याऐवजी त्यांना त्यांचे घर कसे डिझाइन करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी देतो. संविधानाने पर्याप्त घरबांधणीसाठी किमान मानके सूचीबद्ध केली असतील, परंतु ते इतकेच का मर्यादित असावेत? Visava ऑफर करत असलेल्या टूलसह, इच्छुक घरमालकांना त्यांची घरे बांधण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त उपाययोजनांची आवश्यकता नसताना, अगदी किमान पेक्षा अधिक प्रदान करण्याची आशा आहे. या प्रक्रियेच्या व्यापक अनुभवासाठी, आम्ही तुम्हाला खालील व्हिडिओ पाहण्याची आणि तुमच्या घराला डिझाइन करण्यासाठी Visava वापरण्याच्या सुलभतेशी स्वतःला परिचित करून घेण्याची विनंती करतो.