पर्याप्त घरबांधणीचा हक्क हा कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेला सर्वात मूलभूत हक्क आहे. तरीही, इतर अनेक मूलभूत अधिकारांचा वापर करण्यास सक्षम असण्याचा तो परिपूर्ण गाभा आहे ज्यामुळे एखाद्याला सन्मानाने जीवन जगता येते. सामान्य आरोग्यापासून सुरक्षिततेपर्यंत शैक्षणिक यशापर्यंत आणि बरेच काही, जेव्हा घरबांधणीच्या गरजा पर्याप्त प्रमाणात पूर्ण होत नाहीत तेव्हा त्यात एक्सेस करणे कठीण होते. म्हणूनच, 1948 च्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणा आणि आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवरील 1966 च्या आंतरराष्ट्रीय कॉन्व्हेंटमध्ये मान्यता मिळाल्यावर, पर्याप्त जीवनमानाच्या अधिकारात तो एक अविभाज्य जोड बनला.
पण पर्याप्त घरबांधणी ही फक्त चार भिंती आणि डोक्यावर छप्पर बांधण्यापुरती मर्यादित आहे का? किंवा हक्कामध्ये फक्त त्याच्या भौतिक पैलूंच्या तुलनेत त्याचा व्यापक अर्थ समाविष्ट असतो का? अनेक निकषांची पूर्तता केल्यानंतरच एखाद्याला राहण्यासाठी निवारा पुरेसा मानला जाऊ शकतो. पुरेशी स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, हीटिंग, लाइटिंग आणि कचरा विल्हेवाट या काही आवश्यक गोष्टी मानल्या जातात. भारतातील घरबांधणी मानके (1947 मध्ये पर्यावरण आणि आरोग्य समितीने शिफारस केलेली) निवारा पुरेसा मानला जाण्यासाठी अनेक किमान पैलू नमूद करतात ज्यांचे समाधान करणे आवश्यक आहे. प्रति व्यक्ती किमान 100 स्क्वेर फूट फ्लोर एरिया असणे आवश्यक आहे, लिव्हिंग रूमचा एरिया प्रति व्यक्ती 50 स्क्वेर फूट पेक्षा कमी नसावा. सर्व जागांची उंची प्रति व्यक्ति किमान ५०० क्यूबिक फुट एअर स्पेस एवढी असावी, शक्यतो 1000 क्यूबिक फुट. खिडकीचा एरिया फ्लोर एरियाच्या 1/5व्या भागा इतका असावा (ग्रामीण भागात, ते 10% पर्यंत असू शकते), तर दरवाजे आणि खिडक्या एकत्रितपणे फ्लोर एरियाच्या 2/5व्या भागावर असणे आवश्यक आहे. पुरेसा पाणीपुरवठा हा पर्याप्त घरबांधणीचा महत्त्वाचा पैलू आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने शहरी पाणीपुरवठ्यासाठी 135 एलपीसीडी (दरडोई लिटर प्रतिदिन) चा बेंचमार्क सुचवला आहे, तर ग्रामीण भागासाठी तो 55 एलपीसीडी निश्चित केला आहे. ही काही मूर्त मानके होती जी पुरेसा निवारा बनवतात.
हक्कामध्ये काही अमूर्त पैलू देखील समाविष्ट आहेत. ही लोकांना दिलेली स्वातंत्र्ये आणि अधिकार आहेत. ते एकत्रितपणे खात्री करतात की, पर्याप्त घरबांधणीच्या अधिकारावर लक्ष केंद्रित करताना, एखाद्या व्यक्तीचे इतर काही मूलभूत हक्क गमावले जाणार नाहीत. शेवटी, मानवी हक्क हे परस्परावलंबी, अविभाज्य आणि परस्परसंबंधित आहेत आणि त्यापैकी एक नाकारल्याने इतरांवर थेट परिणाम होतो.
चला आता आपण पर्याप्त घरबांधणी अंतर्गत देण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य आणि हक्कांबद्दल बोलूया. भारतीय संदर्भात, आश्रयस्थानाची व्याख्या केवळ एखाद्या व्यक्तीच्या जीवाचे आणि अवयवांचे संरक्षण करण्यापुरती मर्यादित नाही. हे असे घर आहे जिथे त्यांना शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकरित्या वाढण्याच्या संधी मिळतात. म्हणून, निवारा हक्कामध्ये पुरेशी राहण्याची जागा, सुरक्षित आणि सभ्य बांधकाम, स्वच्छ आणि सभ्य परिसर, पुरेसा प्रकाश, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्वच्छता आणि रस्ते इत्यादीसारख्याइतर नागरी सुविधांचा समावेश होतो. हे आवश्यक आहे की पर्याप्त घरबांधणीच्या तरतुदीने तेथील रहिवाशांच्या समस्या कमी करण्यासाठी सक्रियपणे कार्य केले पाहिजे जेणेकरून ते त्यांचे राहणीमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील. जेव्हां घरातून बाहेर काढण्याची सतत धमकी किंवा प्रत्येक नवीन निवारा येथे त्यांच्या मुक्कामाच्या कालावधीबद्दल अनिश्चिततेचा सामना करावा लागतो, तेव्हां उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत शोधणे किंवा शिक्षण घेणे हा एक व्यवहार्य पर्याय नाही. म्हणून, अधिकारात सक्तीने होणारा बेदखल किंवा आश्रयस्थानांचा होणारा नाश किंवा एखाद्याच्या घरात, प्रायव्हसी मध्ये आणि कुटुंबात होणाऱ्या हस्तक्षेपापासून मुक्ति देणे समाविष्ट आहे. यामध्ये एखाद्याचे निवासस्थान निवडण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतापासून दूर असलेल्या ठिकाणी घरबांधणीची तरतूद असली तर पुन्हा एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आणि आर्थिक कल्याणावर हानिकारक प्रभाव पडतो. जेव्हा बहुसंख्य नॉन-वर्किंग तास प्रवासात घालवले जातात, तेव्हा दिवसाच्या शेवटी सामाजिक समृद्धी गौण ठरते. म्हणून, कोठे राहायचे हे ठरवण्याचा व्यक्तीचा अधिकार विचारात घेतल्याशिवाय पर्याप्त घरबांधणी मिळू शकत नाहीत.
ही स्वातंत्र्ये एखाद्या व्यक्तीचे सामाजिक दडपशाहीपासून संरक्षण करत असताना, हक्क याची खात्री करून घेतात की कल्याणकारी उपाय त्यांच्यासाठी योग्यरित्या वितरित केले जात आहेत की नाही. पर्याप्त घरबांधणीच्या अधिकाराचा वापर केला जात असताना, तो कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता वापरला जाईल याची खात्री करणे आवश्यक असू शकते. हा अधिकार प्रत्येक व्यक्तीला समान रीतीने देण्यात यावा, मग त्याचा सामाजिक दर्जा काहीही असो, मग ते धर्म, वर्ग, जात किंवा इतर कोणत्याही स्वरूपावर आधारित असो. हा व्यक्तीला घरबांधणी-संबंधित निर्णयांमागील प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार देतो. हा सुनिश्चित करतो की समस्येचा रिअल-टाइम दृष्टीकोन राखला जातो आहे की नाही. त्या व्यतिरिक्त, पर्याप्त घरबांधणीचा अधिकार हा कार्यकाळाची सुरक्षितता प्रदान करतो जी त्यांच्या बेदखलीतून होणाऱ्या मुक्तिच्या बरोबरीने असते.एखाद्या व्यक्तीला गमावलेला निवारा, जमीन किंवा मालमत्ता परत मिळवण्याचा अधिकार देऊन विद्यमान पर्याप्त घरबांधणीचे नुकसान देखील हा अधिकार विचारात घेतो.
पर्याप्त घरबांधणी ही चांगल्या मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. असे कठोर नियम, अधिकार आणि स्वातंत्र्ये आहेत जे त्यांचे संरक्षण करतात. त्यांच्याबद्दल अधिक जागरुकता आल्याने, लोकांना स्वतःसाठी निरोगी आणि सुरक्षित राहण्याच्या वातावरणाची खात्री करून घेण्यासाठी या अधिकारांचा दावा करणे सोपे होईल. दिवसाच्या शेवटी, जे लोक या स्वप्नासाठी स्वतःहून लढत आहेत त्यांच्यासाठी जर ते साध्य करण्याची साधने अदृश्य असतील तर अधिकार हा केवळ डॉक्युमेंटवरील एक शब्द आहे. Visava त्यांना हा अडथळा दूर करण्यात मदत करेल अशी आशा बाळगतो आणि त्यांना त्यामध्ये सहज एक्सेस प्रदान करून उन्नतीच्या या प्रक्रियेतील पुढील टप्पा ऑफर करतो. त्यांच्या निर्णयांच्या सर्व शक्यतांबद्दल आणि त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना आणखी काय आवश्यक आहे याबद्दल माहिती देण्याचे ते एक टूल म्हणून कार्य करते.